Saturday, March 23, 2019

तळ्यात-मळ्यात...


वृत्त : मनोरमा
लगावली : गालगागा गालगागा


काल ते तळ्यात आहे,
आज ते मळ्यात आहे.

कोणती रे चिन्हपट्टी,
घातली गळ्यात आहे.

 टाकता फासे असे की,
सावजच जाळ्यात आहे.

आस खुर्चीची तुझीया,
मतलबी डोळ्यात आहे.

कर्म करुनी हीन ऐसे ,
वागतो सोवळ्यात आहे,


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

No comments:

Post a Comment