Tuesday, April 30, 2019


‘महाराष्ट्र माझा'


गुणगान गातो माझ्या,
महाराष्ट्राच्या महतीचे ।।
फिटे ना पांग माझ्या,
महाराष्ट्राच्या मातीचे ।।


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... 

चित्रचारोळी...

सरीता किनारी,
घनदाट वनराई ||
प्रतिबिंब तयाचे,
जलाशयी पाही ||

✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड जि.औरंगाबाद
968 967 5050

Sunday, April 21, 2019



'पवित्र मतदान'


असूनी तू मतदार राजा ,
राजासारखं वागलं पाहिजे ।।
नको नको पडू मोह-मायेत,
देशहितासाठी जागलं पाहिजे ।।

मत तूझे असे लाखमोलाचे,
अवमूल्यन त्याचे करु नको ।।
लोकशाहीची सोडून वाट,
वाईट साथ अशी धरु नको ।।

मतदान असे राष्ट्रीय कर्तव्य,
पवित्र मतदान केलं पाहिजे ।।
लायक अशा उमेदवाराला,
निवडून तर दिलं पाहिजे ।।


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

‘दुष्काळ'


असा दुष्काळ दुष्काळ,
डोई हंड्यांची चळत ।।
पायी बसता चटके,
सुर्य आहे तळपत ।।

पाण्यासाठी डोई हंडे,
चालताती नार सावरत ।।
सर्कशीला लाजवेल अशी,
करावी लागते कसरत ।।


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

Saturday, April 20, 2019

‘दुष्काळ'


असा दुष्काळ दुष्काळ,
डोई हंड्यांची चळत ।।
पायी बसता चटके,
सुर्य आहे तळपत ।।

पाण्यासाठी डोई हंडे,
चालताती नार सावरत ।।
सर्कशीला लाजवेल अशी,
करावी लागते कसरत ।।


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

Wednesday, April 17, 2019

हायकू...


*'अवकाळी'*


नभ ढगाळी
आला तो अवकाळी
भल्या सकाळी

अवेळी असं
तुझ येणं पावसा
ऋतू हा कैसा


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

Tuesday, April 9, 2019

'बाप'

शेतकरी मव्हा बाप,
शेतामधी त्याची वस्ती।
रात दिस काम धंदा,
ऊन-वाऱ्या संग दोस्ती।।

येता उन्हाळ्याचे दिस,
भेगाळले ते वावर।
करुनीया नांगरट,
रान करीतो तयार।।

बरसला तो मीरग,
मव्हा बा दिसे खुशीत।
केली पेरणी बियानं,
निजे मातीच्या कुशीत।।

रान हिरवं हिरवं,
बाप मनाशीच बोले।
पाही हिरवं सपान,
बाप पीकासंग डोले।।

धरी ओढ पावसाळा,
लागे सुखाया ते रान।
पाही अशी अवकळा,
गेले हरवून भान।।

ऊभा उजाडं रानात,
घोर अशी चिंता वाही।
बरसेल हीच आशा,
रोज आभाळाशी पाही।।

नाही पिकल रानातं,
साल अवसान घाती।
बांधावर झाडाखाली,
दोरखंड त्याचे हाती।।

पाहुनीया हे चितर,
मनी दाटले काहूर।
नको करु बा वंगाळं,
पुन्हा फुटलं अंकुर।।

अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
मो.नं. 968 967 5050
anillandge71@gmail.com
वात्रटिका...


*'चौकीदार'*


त्यांचे म्हणणे 'चौकीदार चोर',
यांचे 'मी पण चौकीदार' आहे ।।
विकासाचे सारे मुद्दे सोडून,
नको त्याचा भडीमार आहे ।।

निवडणूक असो कोणतीही,
व्यर्थ मुद्द्यांचा जोरा असतो ।।
बनवा-बनवी करून त्यांचा,
निवडून येण्याचा होरा असतो ।।


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050
वात्रटिका...


*'जाहिरनामा'*


यांचे आहे 'संकल्पपत्र',
त्यांचे 'जन आवाज' आहे ।।
पुर्तता होवो वा न होवो ,
जाहिरनाम्याचा रिवाज आहे ।।

कोणाचे 'जन आवाज',
कोणाचे असो 'संकल्पपत्र'।।
असा असावा जाहिरनामा,
तयात दिसावे विकासाचे चित्र ।।


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

Saturday, April 6, 2019

वात्रटिका...


*'घसरा-घसरी'*


पुन्हा पुन्हा त्यांची,
जीभ घसरत आहे ।।
बोलायला हवे तेच,
नेमके विसरत आहे ।।

वादग्रस्त अशी विधाने,
खरे तर टाळली पाहिजे ।।
सार्वजनिक बोलण्याची,
नैतिकता पाळली पाहिजे ।।


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

Friday, April 5, 2019

अष्टाक्षरी चारोळी...


‘गुढीपाडवा'


सणं वर्षाचा पहिला,
गुढी उभारा उभारा ।।
मनी विसरुनी द्वेष,
करा आनंद साजरा ।।


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...