Wednesday, June 26, 2019

*'असा पाऊस आला'*


असा पाऊस आला,
माती सजली भिजली ||
झाली पेरणं रानात,
जणू बियाणं निजली ||

असा पाऊस आला,
रान भिजवून गेला ||
मनाच्या मातीत माझ्या,
बीज हर्षाचे रुजवून गेला ||


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
9689675050

Saturday, June 22, 2019

चारोळी...


नासले पर्यावरण,
राहिले ना दिन खरे ||
लागुनिया पावसाळा,
परी ना उन्हाळा सरे ||


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
9689675050

Sunday, June 16, 2019


चारोळी...


*'वट पौर्णिमा'*


पतीच्या आयुष्यासाठी,
पत्नी वडाला पुजते ||
संसाराच्या वटवृक्षासाठी,
स्त्री आयुष्यभर रुजते ||


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
9689675050

Saturday, June 15, 2019


पंचाक्षरी चित्रचारोळी...


तोडीतो आंबे,
बाळ इवले ||
बालपण ते,
मनी भावले ||


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
9689675050

Wednesday, June 12, 2019

चारोळी...


‘चाहुल पावसाची’


सुटला वारा उठली वावटळं,
लागली चाहुल पावसाची ।।
असा बरसुनी जा एकदा,
नको सय दुष्काळी दिवसाची ।।


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
9689675050

Sunday, June 9, 2019

वात्रटिका...


‘अंदाज पावसाचा'


यंदा चांगल्या पावसाची,
म्हणे भविष्यवाणी आहे ।।
मागील वर्षाच्या दुष्काळाने,
नयनी आजही पाणी आहे ।।

खरी ठरो एकदाची,
पावसाची भविष्यवाणी ।।
शेतक-याच्या जीवनात,
दिन येवो सोन्यावाणी ।।

मनी जे हवामान खात्याच्या,
प्रार्थना देवाशी तसेच घडो ।।
हवामान खात्याच्या मुखी,
साखर गोड गोड पडो ।।


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050 

Monday, June 3, 2019



चित्रचारोळी...


असे आले वादळ,
नाचले तांडव बेभान ।।
जीवापल्याड बागेची,
कशी झाली धूळधाण ।।


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
9689675050/9021261820

Sunday, June 2, 2019


'येरे पावसा'


श्रमदानातून आज,
गाळलास घाम आहे ||
नका करू तीर्थयात्रा,
कष्टातच राम आहे ||

त्याची करावी आर्जव,
हे आपले काम आहे ||
बरसेल तो एकदाचा,
वर्षा त्याचे नाम आहे ||

आकाशी जमतात ते,
मेघ त्याचे धाम आहे ||
वर्षतो त्याला दिल्यास,
खोटा पैसा दाम आहे ||


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050