Wednesday, July 31, 2019


*'सावता'*


माझा रे सावता | फुलवितो मळा |
हरीनाम गळा | भक्तीभावे ||१||

माझा रे सावता | लावी भाजीपाला |
पाही विठ्ठलाला | तयामधी ||२||

माझा रे सावता | भक्ती तया ठाई |
नित्य गुण गाई | विठ्ठलाचे ||३||

माझा रे सावता | भक्तीचा सागर |
प्रेमाचा आगर | ओतप्रोत ||४||

माझा रे सावता | संत शिरोमणी |
असे मज मनी | वंदनीय ||५||


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

Friday, July 12, 2019


*'रुप पाहता लोचनी'*


पंढरीच्या राणा विठ्ठला,
रुप पाहता लोचनी तुझे ।।
मिळे अंतरीचे समाधान,
ठेविता चरणी मस्तक माझे ।।


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
9689675050

Sunday, July 7, 2019


अष्टाक्षरी...चित्रचारोळी...


शालू नेसुनी हरित,
भासे सुंदर धरती || 
गिरी पर्वत मुकुट,
शोभे तो शिरावरती ||


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
9689675050

Friday, July 5, 2019


षडाक्षरी...चित्रचारोळी...


धुक्यातून जाते,
वळणाची वाट ||
निसर्गाने कसा,
मांडियला थाट ||


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
9689675050