Saturday, February 20, 2021


हायकू रचना… 



चालते जेव्हा 

खोडावर कुऱ्हाड

रडते झाड


तोडता झाड

रान होई उजाड

कृती ही भ्याड


असावी मनी

झाडांबद्दल कीव

असतो जीव



✒अनिल लांडगे उंडणगाव

ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद

9689675050/9021261820

Wednesday, March 25, 2020


'वर्दीतील देव'


पोलिसांच्या ठाई,
दया भाव असतो।।
तेंव्हा मज खरेतर,
वर्दीतील देव भासतो।।


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
9689675050

Thursday, January 2, 2020


*‘सावित्री'*

सावित्री तु सोसलेल्या,
जाचाची अंतरी सय आहे।।
तरी घरो-घरीच्या लेकीला,
छळवादाचे भय आहे।।

सावित्री तुझ्या कार्याचं,
नित्यची स्मरण आहे।।
आजही तुझ्या लेकीचं,
गर्भातच मरण आहे।।

फुलत्या कळीला न खुडणे,
पाळावया हे बंधन आहे।।
क्रांतीज्योती सावित्रीला,
हेच खरे वंदन आहे।।


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

Thursday, December 19, 2019

वात्रटिका...


*'राजकीय-भारूड-अभंग'*


अधिवेशनात कोणी अभंग,
कोणी गातो भारूड आहे ||
जनतेच्या मानगुटीवर मात्र,
राजकारणाचे गारूड आहे ||

हा प्रश्न आहे ज्याचा-त्याचा,
कोणास काय गाणं आहे ||
एवढे एक मात्र लक्षात ठेवा,
जनतेशी आपलं देणं आहे ||


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

Thursday, November 7, 2019


वात्रटिका...


*'खेळ खुर्चीचा'*


पावसात सारे वाहून गेले,
मदतीचा येथे ना मेळ आहे ||
पडले ना कोणास काही,
चालला खुर्चीचा खेळ आहे ||

खुर्चीचा हा खेळ  तुमचा,
थांबणार कधी कळत नाही ||
नाही राहणार उभा शेतकरी,
जो पर्यंत मदत मिळत नाही ||


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

Saturday, October 26, 2019


*'दिवाळी'*


आला दिवाळीचा सण,
हर्षीत झाले हे मन।।
ईच्छा आपणासी लाभो,
उत्तम आरोग्य धन।।

आला दिवाळीचा सण,
सण आनंदाचा मस्त।।
असो नित्य डाईवरी,
लक्ष्मीचा वरदहस्त।।

सण मोठा दिवाळीचा,
प्रकाशाचे दिवे जळू दे ।।
आरोग्य, सुख-शांतीरुपी,
जीवन आपले उजळू दे ।।


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
9689675050

Thursday, September 5, 2019

‘शिक्षक’


शिक्षक असतो | जैसा की कुंभार |
गाऱ्यासआकार | देत असे।।१।।

शिक्षक असतो | शामची माऊली |
प्रेमाची साऊली | शिष्यावरी।।२।।

शिक्षक असतो | वात्सल्याचा सिंधु |
सन्मानाचा बिंदू | समाजात।।३।।

शिक्षक असतो | व्यवहार ज्ञानी |
अमृताचे वाणी | गुरुमुखी।।४।।

शिक्षक भासे तो | ईश्वरस्वरुप |
पाहता हुरुप | तनोमनी।।५।।

शिक्षक धरितो | सत्याची ती कास |
मनी असे आस | शिष्यहित।।६।।

शिक्षक करितो | मुलांशी संस्कार |
ज्ञानाचा भास्कर | वंदनीय।।७।।


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड जि.औरंगाबाद
968 967 5050