Wednesday, November 22, 2017

हायकू...

अवेळी असं
तुझ येणं पावसा
ऋतू हा कैसा


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

Tuesday, October 17, 2017

दिवाळी...


आला दिवाळीचा सण,
हर्षीत झाले हे मन।।
ईच्छा आपणासी लाभो,
उत्तम आरोग्य धन।।

आला दिवाळीचा सण,
सण आनंदाचा मस्त।।
असो नित्य डाईवरी,
लक्ष्मीचा वरदहस्त।।


दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050
दिवाळी...


सण मोठा दिवाळीचा,
प्रकाशाचे दिवे जळू दे ।।
आरोग्य, सुख-शांतीरुपी,
जीवन आपले उजळू दे ।।


दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

Friday, August 25, 2017

चारोळी...


सुखकर्ता तू दु:खहर्ता,
गौरीनंदन, गणराया ||
घेऊन सवे सुखशांती,
तुम्ही वाजत-गाजत या ||


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

Sunday, August 20, 2017

चारोळी...


*पोळा'*


बरसुनिया जाता पाऊस,
श्रावणमास भासे गोजिरा ||
हर्षला तनोमनी बळीराजा,
करु पोळा सण साजरा ||


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

Monday, July 10, 2017

चारोळी...


असूनिया पावसाळा,
मज उन्हाळा भासे ||
बदलते हे दिनमान,
कळेना असे कसे ||


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

Tuesday, July 4, 2017

'संत मांदियाळी'

भागवत धर्मी | रचियला पाया
झिजवली काया | ज्ञानेशांनी ||१||

तुझ्या रे चरणी | ठेवावा हा माथा |
काढली ती गाथा | तुकोबांची ||२||

माझ्या बा विठ्ठला | लावितोया लळा |
फुलवितो मळा | सावत्याचा ||३||

पंढरीचा राणा | खंड्या रुप धरी |
रांजण तो भरी | नाथा घरी ||४||

भक्ताच्या हाकेला | धावूनिया जाती |
तुडवितो माती | गोरोबाची ||५||

तुझ्याशी विठ्ठला | भक्तीचे हे नाते |
ओढीतो रे जाते | जनाईचे ||६||

भक्त वत्सल तू | नेवैद्य दाखविला |
तुज खावविला | नामयाने ||७||

माप घेता कटी | हरी तोचि हर |
झाला साक्षात्कार | नरहरी ||८||

'विठु' पाटलाचा | मी बलुतेदार |
भक्ती ती अपार | चोखोबाची ||९||

✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

Saturday, June 17, 2017

*'बाबा'*


बाबा म्हणजे कोण?
प्रेमाची साऊली असते ||
वारीला जावून करु काय?
घरातच विठुमाऊली असते ||


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

Sunday, June 4, 2017

*‘पर्यावरण'*


पर्यावरणाचा करुनी ऱ्हास,
काय मिळणार माणसाला।।
कोपला एकदा निसर्ग की,
उभा जाणार माणसाला।।

करु नकोस छळ माणसा,
निसर्गाचे अनंत उपकार।।
क्रुपया पर्यावरणाचे संवर्धन,
तव स्वप्न होईल रे साकार।।


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050
चारोळी...


*‘पहिला पाऊस’*


पहिल्या पावसात,
माती झाली न्हातीधुती।।
पेरेल शेतकरी अन्,
होईल आता नवनिर्मिती।।


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

Friday, June 2, 2017

साहित्य स्पंदन आयोजित...
लेख स्पर्धा...

*'तृतीय क्रमांक प्राप्त लेख'*


*'पर्यावरण आणि मानव'*

मानवाच्या उत्क्रांती काळापासून म्हणजे उत्क्रांतीच्या पहिल्या टप्प्यापासून मानव  उत्क्रांती होत होत ते थेट आजच्या माणसापर्यंत मानवाच्या उत्क्रांती व विकासासाठी पर्यावरणाची आवश्यकता भासलेली आहे. नव्हे तर पर्यावरण हे अभिन्न अंग राहिलेले आहे. थोडक्यात काय तर अनादी काळापासून ते आजपावेतो पर्यावरण व मानव हे एकमेकांना राहिलेले आहे व कायम असणार आहे.
आपल्या अवतीभवतीचा पूर्वाश्रमीचा नितांतसुंदर परीसर व नटलेला निसर्ग जो आज मानवाने ओरबाडून काढला आहे. यालाच आपण पर्यावरण म्हणतो. हवा, पाणी, जमीन, वनस्पती, पशुपक्षी, कीटक, जंगल, डोंगर, शेती, नदी-नाले, गवत, समुद्र आणि मानव या सर्वांचे मिळून तयार होते ते पर्यावरण होय. थोडक्यात मानवाच्या भोवतालचा व मानवाच्या जगण्यात मोलाचा हातभार लावणारा सजीवांना सुर्य, पाणी, जमीन आणि हवा अशा विविध उपयुक्त घटकांनी युक्त असलेला परीसर म्हणजे पर्यावरण होय.
मानवी जीवनच नव्हे तर सबंध सजीव सृष्टी साठी पर्यावरणचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. पर्यावरणामूळेच सजीव सृष्टीचे चक्र अव्याहत चालू आहे. सुर्य, हवा, पाणी, व जमीन हे पर्यावरणाचे मुख्य घटक माणल्या गेलेले आहेत. आणि आज आपण सहज जरी विचार केला तर मानव व अन्य जीवसृष्टीसाठी या घटकांपैकी प्रत्येक घटकाचे महत्त्व खुप आहे. किंबहुना या घटका पैकी एकही घटक नसेल तर काय होईल याची कल्पना न केलेली बरी. कारण मानव व पर्यावरणाचे घटक यांचा मेळच असा घालण्यात आलेला आहे की पृथ्वीवरंच हे सृष्टीचक्र अतिशय संतुलित फिरत राहवयास हवे आणि आपण बघतो की कोट्यावधी वर्षापासून हे चक्र सुरळीत फिरत आहेत. थोडक्यात पर्यावरणाचे महत्त्व किती आहे हे आपणास कळून येते.
मानवाने आपल्या स्वतःच्या भौतिक सुखासाठी, विज्ञानाच्या नवनवीन शोधांच्या नावाखाली व स्वतःच्या स्वार्थापोटी पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास केला व करणे चालूच आहे. मानवी जीवन व पर्यावरण हे एकमेकांना पूरक आहे. एकमेकावर अवलंबुन आहे. आणि म्हणूनच 'जसे घेतले तसे दिले पाहिजे' या तत्त्वाचा माणसाला जणू विसरच पडला आहे. व तो केवळ पर्यावरणाला ओरबाडून काढत आहेत. पर्यावरणाकडू आपण काही घेऊ तसे त्यातून निर्माण होणारी कमतरता भरुन काढण्यासाठी मानवाने काही तरी दिले पाहिजे परंतु दुर्दैवाने असे होतांना दिसून येते नाही.
मानवाने पर्यावरणाचा केलेला ऱ्हास याचे परिणाम आज खुद्द मानव भोगत आहे. व पुढे असेच चालत राहिले तर या परिणामाची व्याप्ती केवढी भीषण असेल याचा विचार व कल्पना नाही केलेली बरी. भारतात आज घडीला पाण्याच्या विविध स्त्रोतांचा विचार केला तर मानवास उपयुक्त जलसाठा वर्षभर राहू शकतो परंतु उन्हाळ्यात आज पाण्याचे संकट एवढे रौद्ररूप धारण करते की, कित्येक वर्षांपासून येथे अवर्षण झाले असे वाटते. औद्योगिकरणाच्या नावाखाली आज हवा व जमीन या घटकांचा ही मोठा ऱ्हास होतो आहे. शेतातील भरघोस उत्पादनाच्या नावाखाली रासायनिक खते व किटकनाशकाचा मारा करून जमिनीची पोत निकृष्ट करीत आहोत. खरेतर आपण पर्यावरणाचा नाश म्हणजे पर्यायाने आपलाच विनाश करत आहे.
आज पर्यावरण ऱ्हासाची तीव्रता, परिणाम याची मानवाला कल्पना यायला लागली व 5 जून या दिवशी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. असो तरीही अजून पर्यावरणाचे ज्या पद्धतीने संवर्धन करणे आवश्यक आहे तसे दिसून येते नाही. खर म्हणजे पृथ्वीवरील सर्व चराचर सृष्टीचा आधार हे पर्यावरण आहे. पृथ्वीशिवाय अन्यत्र पर्यावरण नाही. आणि म्हणूनच पर्यावरण ही मानवाला मिळालेली महान देणगी आहे. व त्याचे संवर्धन होणे ही काळाची गरज आहे.
अशा प्रकारे पर्यावरणाला मानवी जीवनात व सजीव सृष्टीत एक अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेले आहे. हे ओळखून आपण मानवी कल्याणासाठी, नव्हे आपल्या स्वतःच्या कल्याणासाठी या पर्यावरणाचे करुया व आपले व आपल्या नंतरच्या येणाऱ्या पिढीचे जीवन सुखकर करुया.


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

Sunday, May 14, 2017

*'आई'*


आईच्या ममतेला,
कशाची ना सर।।
गोड किती जशी,
फणसातील गर।।

आईच्या हातची,
प्रेमाची भाकर।।
खाऊनिया द्यावी,
तृप्तीची ढेकर।।

मायेच्या पदराची,
धरीता साऊली।।
ममतेची शीतलता,
असून ही काहिली।।

प्रेमाचा अर्थ ममता,
ममतेचा अर्थ माया।।
वारसा हा आईचा,
घरासाठी झिजवी काया।।


मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050
http://anillandgeundangaonkar.blogspot.com

Thursday, May 11, 2017

वात्रटिका...

*'सत्तेची हवा'*

सत्तेची हवा कशी,
डोक्यात बरे गेली ||
नको नको ती बेताल,
वक्तव्य त्यांनी कली ||

हवा सत्तेची डोक्यात,
अशी जाणे बरे नसते ||
भावी राजकारणाचे,
त्यांच्या काही खरे नसते||

✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

Friday, May 5, 2017

साहित्य स्पंदन आयोजित...
कामगार दिनानिमित्त लेख स्पर्धा...

*'उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त लेख'*


*'जीवनात श्रमाचे महत्त्व'*


समाजामध्ये आज श्रमिक कामे व अश्रमिक कामे याची तुलना होताना दिसून येते. आज श्रमिक कामापेक्षा एखाद्या कार्यालयातील टेबल वरचे काम हे श्रेष्ठ तर जे कष्टाचे काम हे हीन दर्जाचे काम असा समाजाने करुन घेतलेला गैरसमज सर्वत्र बघावयास मिळतो.
परंतु श्रमिक कामे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे किंबहुना श्रेष्ठ आहे. असे म्हटले तरी ते वावगे ठरु नये. विविध कार्यालयातील बाबू व साहेब बसल्या जागी काम करतात, परंतु आपल्याला हा विचार करावा लागेल की, जर शेतकऱ्यांनी आपल्या शेतात श्रमाचे (कष्टाचे) काम करुन अन्नधान्य पिकवलेच नाहीत तर काय होईल याची कल्पना न केलेली बरी. आणि म्हणूनच श्रम हे खुपच महत्वाचे आहे.
म्हणतात ना..... *'जिथे राबती हात तेथे हरी'*

*'श्रमातून सृजनता निर्माण होते'* म्हणजे माणूस श्रमातूनच नवीन गोष्ट निर्माण करु शकतो. जसे शेतकरी मातीतून धान्य निर्माण करतो. कामगार हा आपल्या कार्यशाळेत (कारखाना) वेगवेगळ्या लोकोपयोगी वस्तूंची निर्मिती करतो व आपल्या गरजा भागवतो. केवळ एखाद्या टेबलावर बसून खर्डेघाशी करुन हे होऊ शकत नाही.
तसेच आज समाजात ज्या थोर व्यक्ती होऊन गेलेल्या आहेत त्यांची आत्मचरित्रे किंवा चरित्रे वाचल्यास आपणास हेच दिसून येत की, जे थोर व्यक्ती झाले ते केवळ त्यांनी जिवंतपणी घेतलेल्या अपार कष्टामूळेच. आणि मग असे असले तर श्रमिक कामे ही दुय्यम दर्जाची असतात असे कसे म्हणता येईल. यावरून एकच गोष्ट सिद्ध होते की कोणतेही काम हे कमी दर्जाचे नसते.
खरे तर जीवनात श्रमाशिवाय (कष्टाशिवाय) पर्याय नाही. नव्हे *'श्रम हाच माणसाचा खरा दागिना आहे'*. असे मला वाटते. श्रम केल्याने माणूस हा खऱ्या अर्थाने समाधानी, सुखी व निरोगी राहतो. आणि त्यामुळेच *'सत्यमेव जयते'* या वचनाइतकेच *'श्रममेव जयते'* हे ही वचन सत्य आहे.

आणि म्हणूनच.....

*देरे हरी खाटल्यावरी,*
*यासी अर्थ नसे काही ||*
*जीवनात आज तरी,*
*श्रमाशिवाय पर्याय नाही ||*


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050
http://anillandgeundangaonkar.blogspot.com

Monday, May 1, 2017

*'महाराष्ट्र दिन'*


तुजसाठी जगणं-मरणं,
मज महाराष्ट्राची माती ||
गाऊ चला तिची महती,
तयाचा टिळा लावू माथी ||


महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

Wednesday, April 19, 2017

वात्रटिका...


*'लाल दिवा'*

गेला आमचा आता,
गाडीवरचा लाल रं दिवा ||
थाट-माट आमचा आता,
नाही राहिला रं भावा ||

लाल दिव्याच्या गाडीत,
आम्ही मिरवत होतो ||
नुसतेच उद्घाटनं करुन,
जनतेला झुरवत होतो ||


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

Friday, April 14, 2017

*'महामानव'*

जयंतीच्या शुभ दिनी,
विशुद्ध अशा मनी।।
महामानवाचा संदेश,
असावा सदैव ध्यानी।।


बाबासाहेबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

Monday, April 3, 2017

वात्रटिका...


*‘दारुबंदी’*


महा मार्गावरील दारू,
आता झाली की बंद।।
पिऊन गाडी चलवण्याचा,
खरेच बंद होइल का छंद।।

 दारूबंदी आदेशाचे घोडे,
कागदावर नाचायला नको।।
रस्ते अपघातात एवढे ठार,
वर्तमानपत्रात वाचायला नको ।।


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

Monday, March 27, 2017

*‘गुढीपाडवा'*


आत्मविश्वासाच्या काठीला,
साखर गाठ गोड कर्माची।।
निंबाचे कटुसत्य अनुसरुया,
गुढी उभारु कर्तव्य धर्माची।।

गुढीत असे वस्र तयाची,
सुख-दु:खाची शिवणं।।
सर्वांना सामावे कलश,
गुढी एकतेची शिकवणं।।


✒अनिल लांडगे उंडणगाव@27
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

Monday, March 20, 2017

काव्यप्रकार – सुधाकारी...

*‘चिमणी’*

चिऊ चिऊ चिऊ
चिऊचा चिवाट
वर्णावा तो थाट
          चिमणीचा॥१॥

दात ओठ एक
ईवलिशी चोच
थूई थुई नाच 
          अंगणात॥२॥

चिमणीच्या साठी
ठेवूनिया पाणी
वाचेल चिमणी
          गरज ती॥३॥

जागतिक चिमणी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!       

अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

http://anillandgeundangaonkar.blogspot.com

Friday, March 17, 2017


चित्र चारोळी...


मुलगा नाचतो बायकोच्या तालावर,
आश्रमात माय झाली बापाची काठी।
आजही भ्रुणहत्या होतेय राजरोज,
काय तर म्हणे वंशाच्या दिव्या साठी।।


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050
http://anillandgeundangaonkar.blogspot.com

Thursday, March 16, 2017

वात्रटिका

‘सातबारा’

मागणारे मागत असता,
देणारेही मागत आहे
शेतकऱ्यांचा सातबारा,
कर्जमाफीसाठी रांगत आहे॥

सातबारा म्हणे सरकारला,
मलाही आता कोरा करा॥
तुमच्या सोबत माझ्याही,
धन्याचा विकास करा॥

अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

http:/anillandgeundangaonkar.blogspot.com

Saturday, March 11, 2017

(काव्यप्रकार :- अष्टाक्षरी)

*'होळी'*

फुलता पलाश रानी,
सण येतो हा होळीचा ||
होळी खेळा रे कोरडी,
मुद्दा पाण्याचा कळीचा ||

अन् असा रे करुया,
साजरा होळीचा सणं ||
जाळू ना लाकुडफाटा,
वृक्षवल्ली हेच धन ||

दिस होळीचा दुसरा,
असे धुळवड सणं ||
करा त्यात नैसर्गिक,
रंगाची रे उधळणं ||


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

Wednesday, March 8, 2017

चारोळी...

*'तिची भरारी'*

नारी तुझी कहाणी,
अशी मनास विदारी ||
लेक आज सावित्रीची,
बघ तिची रे भरारी ||


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050
*'महिला दिन'*


*म*हान तू,
*हि*मालयाची उंची तुझी,
*ला*ज शोभे चेहऱ्यावरी ||
*दि*व्यातली जळणारी वात तू,
*न*रापेक्षा श्रेष्ठ नारी ||


महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

Sunday, February 26, 2017

‘मराठी दिन'

चला सर्वजण,
बोलुया मराठी।।
इंग्रजाळलेल्या माथी,
हाणुया काठी।।

आपल्या डोई,
मराठीचे रिन।।
बोलुनिया मराठी,
करुया साजरा दिन।।

✒अनिल लांडगे उंडणगाव,
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
9689675050/9021261820

Friday, February 24, 2017

शेल चारोळी...


तुझ्या आठवणींचा चाले,
चाले रे असा लपंडाव ll
किती सोसावे रोजच ते,
ते काळजा वरील घाव ll


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

Thursday, February 23, 2017

शेल चारोळी...


मला आवडायचे म्हणूनी,
म्हणूनी गजरा माळायची||
दररोज पाहता मी मात्र,
मात्र जीव माझा जाळायची||


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

Wednesday, February 15, 2017

वात्रटिका...

*'निवडणूक'*

निवडणूक स्थानिक ची,
लढाईच मैदान गल्लीतलं।।
याला घ्या त्याला नको,
राजकारण जणू दिल्लीतलं।।

निवडणूक स्थानिक ची,
हौश्या-नवश्याची घाई आहे।।
विकले जातील दारु-पैशावर,
हीच आपली लोकशाही आहे।।


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

Monday, February 13, 2017

चारोळी...

*'तुझ्यावर लिहिताना'*


1)

तुझ्यावर लिहिताना,
उठे मनात काहूर ||
तुझा चेहरा नयनी,
अन् मनी हुरहुर ||

2)

तुझ्यावर लिहिताना,
हात थरथर कापे ||
आठवण होता तुझी,
ह्रदय असे कारे धापे ||


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

Tuesday, February 7, 2017

वात्रटिका...

*'सोन्याचे ताट'*


सत्तेत नसलो जरी,
वेगळेच थाट आहे ||
भोजनाशी आम्हा,
सोन्याचे ताट आहे ||

नसलोत सत्ताधारी तरी,
सत्तेचा गर्व मेला नाही ||
जळाला जरी सुंभ आमचा,
पिळ मात्र कधी गेला नाही ||


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

Sunday, February 5, 2017

वात्रटिका...

*'मैत्रीपूर्ण लढत'*


ते म्हणाले की आपली,
मैत्रीपूर्ण लढत आहे ||
अन् प्रचार सभां मधून,
एकमेकांवर भिडत आहे ||

लढत असोत कोणतीही,
मैत्रीपूर्ण घडत नसते ||
मतलबासाठी  बोलण्याची,
अशी गरज पडत असते ||


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

Saturday, February 4, 2017

वात्रटिका

*'बंडखोरी'*


पक्षा-पक्षात आज,
बंडखोरीला ऊत आहे ||
निष्ठावंतांच्या मानगुटीवर,
बंडखोरीचं भूत आहे ||

बंडखोरांच्या बंडखोरीमूळे,
निष्ठावंतांना धोका आहे ||
बंडखोरांच्या आशीर्वादने,
विरोधकांना मोका आहे ||


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

Wednesday, February 1, 2017

चारोळी...

'सांजवेळ'


अशी कशी मजला तू,
अवचित वेळी भेटते||
अन् सांजवेळची वेदना,
अंतरी मज गं दाटते||


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

Monday, January 30, 2017

चारोळी...

'सांजवेळ'


अशी कशी मजला तू,
अवचित वेळी भेटते||
अन् सांजवेळची वेदना,
अंतरी मज गं दाटते||


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050
चारोळी...

'सांजवेळ'


अशी कशी मजला तू,
अवचित वेळी भेटते||
अन् सांजवेळची वेदना,
अंतरी मज गं दाटते||


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050
चारोळी...

'सांजवेळ'


अशी कशी मजला तू,
अवचित वेळी भेटते||
अन् सांजवेळची वेदना,
अंतरी मज गं दाटते||


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

Friday, January 27, 2017

*'ऊसतोड'*

बायको अन् पोरंसोरं
कुटुंब सार बैलगाडीवर।।
विंचवाचं बिऱ्हाड जसे
सारे त्याच्या पाठीवर।।

ऊसतोड कामगाराला,
ना दिवाळी ना होळी।।
रोजचीच भाजी-भाकर,
हीच त्यांची पुरणपोळी।।

घरादारा पासून दूर,
आम्ही ऊसतोड करतो।।
थोड्याफार सुखासाठी,
दु:ख कोयत्याने चिरतो।।

✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

Wednesday, January 25, 2017

वात्रटिका...

*'आयाराम गयाराम'*

आयाराम गयारामा ची,
पक्षा-पक्षात गर्दी असते ||
खरे तर ही निवडणूक,
आल्याची वर्दी असते ||

पक्षांतर करतांना घेतलेल्या,
शपथा खोट्या असतात||
आयाराम यांच्या आयत्या,
पिठावर रेघोट्या असतात||


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

Monday, January 23, 2017

चारोळी...

*'हसरा/हसरी'*


तुझा हसरा चेहरा,
जसा गुलाब खुलतो||
पाहुनिया मनी जनू,
मोर पिसारा फूलतो||


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

Thursday, January 19, 2017

चारोळी...

*'तुझ्यावर जीव जडला'*


झाली पेरणं पेरणं,
पाऊसही असा पडला।।
पाहुनिया हिरवं रान,
मातीवर जीव जडला।।


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050
चारोळी...

*'तुझ्यावर जीव जडला'*


पुनवेचा तो मुखचंद्र,
जलाशयात पडला।।
पाहुनिया वेडापिसा,
जीव तुझावर जडला।।


✒अनिल लांडगे उंडणगाव@27
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

Monday, January 16, 2017

चारोळी...

*'घायाळ  पक्षिणी'*

सुनसान रस्त्यावर मी,
पक्षिणी घायाळ आहे।।
खिळून होते लाल डोळे,
मानेवर आयाळ आहे।।


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

Friday, January 13, 2017

अष्टाक्षरी चारोळी...


आला आला वर्षारंभी,
संक्रांतीचा सण आला।।
देऊ घेऊ तिळ - गुळ,
चला गोड गोड बोला।।


संक्रांतीच्या आपणांस हार्दिक शुभेच्छा!


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

Wednesday, January 11, 2017

वात्रटिका...

*'सायकल'*


वाद आहे असा की,
सायकल चिन्ह कोणाचं।।
तयासाठी शपथपत्र,
दिड - लाख पानाचं।।

बाप-लेका मध्ये वाद,
सायकल म्हणे मोटारीला।।
चार चाकाची घमेंड नको,
आज भाव मला आला।।


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050
चारोळी ...

‘आरसा'

आरशात असे पाहतांना,
एकदम दचकलोनां राव।।
मला पाहून म्हणतो कसा,
आतातरी खरा चेहरा दाव।।


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050