'संत मांदियाळी'
भागवत धर्मी | रचियला पाया
झिजवली काया | ज्ञानेशांनी ||१||
तुझ्या रे चरणी | ठेवावा हा माथा |
काढली ती गाथा | तुकोबांची ||२||
माझ्या बा विठ्ठला | लावितोया लळा |
फुलवितो मळा | सावत्याचा ||३||
पंढरीचा राणा | खंड्या रुप धरी |
रांजण तो भरी | नाथा घरी ||४||
भक्ताच्या हाकेला | धावूनिया जाती |
तुडवितो माती | गोरोबाची ||५||
तुझ्याशी विठ्ठला | भक्तीचे हे नाते |
ओढीतो रे जाते | जनाईचे ||६||
भक्त वत्सल तू | नेवैद्य दाखविला |
तुज खावविला | नामयाने ||७||
माप घेता कटी | हरी तोचि हर |
झाला साक्षात्कार | नरहरी ||८||
'विठु' पाटलाचा | मी बलुतेदार |
भक्ती ती अपार | चोखोबाची ||९||
✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050
भागवत धर्मी | रचियला पाया
झिजवली काया | ज्ञानेशांनी ||१||
तुझ्या रे चरणी | ठेवावा हा माथा |
काढली ती गाथा | तुकोबांची ||२||
माझ्या बा विठ्ठला | लावितोया लळा |
फुलवितो मळा | सावत्याचा ||३||
पंढरीचा राणा | खंड्या रुप धरी |
रांजण तो भरी | नाथा घरी ||४||
भक्ताच्या हाकेला | धावूनिया जाती |
तुडवितो माती | गोरोबाची ||५||
तुझ्याशी विठ्ठला | भक्तीचे हे नाते |
ओढीतो रे जाते | जनाईचे ||६||
भक्त वत्सल तू | नेवैद्य दाखविला |
तुज खावविला | नामयाने ||७||
माप घेता कटी | हरी तोचि हर |
झाला साक्षात्कार | नरहरी ||८||
'विठु' पाटलाचा | मी बलुतेदार |
भक्ती ती अपार | चोखोबाची ||९||
✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050
No comments:
Post a Comment