Sunday, October 21, 2018

*'रेल्वे दुर्घटना'*

रावण जळत असताना,
निष्पापांवरुन रेल्वे धावे ।।
हळहळतील सारेच परि,
गेले त्यांशी कैसे गावे ।।

आनंदाच्या ऐशा दिनी,
विपरीत का घडत असते ।।
चुक कोणाची यावरच,
चर्चा मात्र झडत असते ।।


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

Saturday, October 20, 2018

वात्रटिका...


*'दुष्काळ पाहणी'*

धुराळा उडवित नेते,
दुष्काळ पाहून गेले ।।
आम्हीच तुमचे कैवारी,
ऐसे काही दावून गेले ।।

दुष्काळ आढावा बैठकीत,
सुक्यामेव्याची ताटली असते ।।
चर्चा झडते दुष्काळावर अन्,
पिण्यास मिनरल बाटली असते ।।


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050
वात्रटिका...


*'रावण दहन'*

दसरा सणाच्या दिनी,
रावणाचे दहन करतो ।।
मात्र रावणाच्या वृत्तीचे,
वर्षभर वहन करतो ।।

रावणवृत्तीचे दहन व्हावे,
अम्हा प्रत्येकाला कळते।।
मागचेच पाढे पंचावन्न,
हेची अम्हासी  वळते ।।


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050
चारोळी...


*दसरा'*

आज दसरा सणं,
वाटू आपट्याची पानं ।।
करुया साजरा दसरा,
देवुन शुभेच्छांचं सोनं ।।


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!