Sunday, June 9, 2019

वात्रटिका...


‘अंदाज पावसाचा'


यंदा चांगल्या पावसाची,
म्हणे भविष्यवाणी आहे ।।
मागील वर्षाच्या दुष्काळाने,
नयनी आजही पाणी आहे ।।

खरी ठरो एकदाची,
पावसाची भविष्यवाणी ।।
शेतक-याच्या जीवनात,
दिन येवो सोन्यावाणी ।।

मनी जे हवामान खात्याच्या,
प्रार्थना देवाशी तसेच घडो ।।
हवामान खात्याच्या मुखी,
साखर गोड गोड पडो ।।


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050 

No comments:

Post a Comment