'बाप'
शेतकरी मव्हा बाप,
शेतामधी त्याची वस्ती।
रात दिस काम धंदा,
ऊन-वाऱ्या संग दोस्ती।।
येता उन्हाळ्याचे दिस,
भेगाळले ते वावर।
करुनीया नांगरट,
रान करीतो तयार।।
बरसला तो मीरग,
मव्हा बा दिसे खुशीत।
केली पेरणी बियानं,
निजे मातीच्या कुशीत।।
रान हिरवं हिरवं,
बाप मनाशीच बोले।
पाही हिरवं सपान,
बाप पीकासंग डोले।।
धरी ओढ पावसाळा,
लागे सुखाया ते रान।
पाही अशी अवकळा,
गेले हरवून भान।।
ऊभा उजाडं रानात,
घोर अशी चिंता वाही।
बरसेल हीच आशा,
रोज आभाळाशी पाही।।
नाही पिकल रानातं,
साल अवसान घाती।
बांधावर झाडाखाली,
दोरखंड त्याचे हाती।।
पाहुनीया हे चितर,
मनी दाटले काहूर।
नको करु बा वंगाळं,
पुन्हा फुटलं अंकुर।।
अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
मो.नं. 968 967 5050
anillandge71@gmail.com
शेतकरी मव्हा बाप,
शेतामधी त्याची वस्ती।
रात दिस काम धंदा,
ऊन-वाऱ्या संग दोस्ती।।
येता उन्हाळ्याचे दिस,
भेगाळले ते वावर।
करुनीया नांगरट,
रान करीतो तयार।।
बरसला तो मीरग,
मव्हा बा दिसे खुशीत।
केली पेरणी बियानं,
निजे मातीच्या कुशीत।।
रान हिरवं हिरवं,
बाप मनाशीच बोले।
पाही हिरवं सपान,
बाप पीकासंग डोले।।
धरी ओढ पावसाळा,
लागे सुखाया ते रान।
पाही अशी अवकळा,
गेले हरवून भान।।
ऊभा उजाडं रानात,
घोर अशी चिंता वाही।
बरसेल हीच आशा,
रोज आभाळाशी पाही।।
नाही पिकल रानातं,
साल अवसान घाती।
बांधावर झाडाखाली,
दोरखंड त्याचे हाती।।
पाहुनीया हे चितर,
मनी दाटले काहूर।
नको करु बा वंगाळं,
पुन्हा फुटलं अंकुर।।
अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
मो.नं. 968 967 5050
anillandge71@gmail.com
No comments:
Post a Comment